भुसावळ कारागृहात दावत-ए-इस्लामी-हिंदच्या जीएनआरएफ विभागांतर्गत कैदी सुधार कार्यक्रम

भुसावळ –
दावत-ए-इस्लामी हिंद 80 विविध विभागांमध्ये धार्मिक आणि सामाजिक सेवा करत आहे, त्यापैकी एक म्हणजे जीएनआरएफ गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन, या विभागाअंतर्गत कारागृहातील कैद्यांसाठी कल्याणकारी कार्य केले जाते असच एक सुधार कार्यक्रम भुसावळ कारागृहातील आयोजित करण्यात आला होता ज्यात दावत-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सदस्य हाजी सलीम अत्तारी यांनी कैद्यांना सांगितले की, आपण अनावश्यक राग आणि सर्व प्रकारच्या नशेपासून दूर राहिले पाहिजे कारण 90 टक्के गुन्हे हे राग आणि नशेमुळे होतात. नशेच्या व रागाच्याभरात कधी कधी चुकीचे पाऊल उचलले गेल्याने माणसाला संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावे लागते, असे सांगून ते म्हणाले की, आपण ने आपल्या पापमय जीवनाचा पश्चात्ताप करून चांगले जबाबदार नागरिक बनले पाहिजे समाज आणि भारताच्या विकासात आपली महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आज संकल्प करा कारागृह अधीक्षक आय . ई . चौहान यांनी दावते इस्लामीच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानताना कैद्यांना सांगितले की, येथे नमूद केलेल्या सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करावे आणि इथे पुन्हा न येण्याचा दृढ संकल्प करा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक हाजी साबीर शेख, दावते इस्लामी इंडियाचे जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी ,जी एन आर एफ चे जिल्हाध्यक्ष रफिक रोशन कादरी यांनी प्रयत्न केले