भुसावळ प्रतिनिधी
येथील श्री अनिरुद्ध उपासना केंद्र व इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात भुसावळ व बोदवड येथील 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच रक्तदात्यांचां उत्साह वाढवण्यासाठी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी देखील रक्तदान करून रक्ताचे महत्त्व सांगितले.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त तयार करता येत नाही. याचे महत्त्व रुग्णांना लागणाऱ्या रक्ता वेळी समजते. याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भुसावळ शहरात ब्राह्मण संघामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची सुरुवात श्री अनिरुद्ध उपासना व प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी 55 भक्तांनी रक्तदान केले. तसेच रक्तदानाचे महत्त्व इतरांना कळावे यासाठी भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी देखील रक्तदान केले. व रक्तदानाचे महत्त्व यावेळी सांगितले. तसेच अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीने सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अनिल घुले, मयूर सरोदे, सागर विसपुते, अविनाश मोरे, उमेश चौधरी, उपासना केंद्रातील कार्यकर्त्यांनी
परिश्रम घेतले




