भुसावळ : भुसावळ शहरासह विभागातील प्रभू श्रीराम मंदिरात रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वत्र दिवसभर भाविकांची दर्शनार्थ गर्दी झाली होती. भुसावळातील जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरापासून काढण्यात आलेल्या पालखीच्या अग्रभागी आळंदी येथील शंभर टाळकरी वारकरी विठूचा नामघोष करीत होते. ते येणार्या जाणार्यांना आकर्षीक करीत होते तर भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप मंदिरांमध्ये करण्यात आले. श्रीराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्रीराम मंदिरे फुलांनी व रोषणाईने सजविण्यात आली.



