भुसावळ –महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण च्या भोंगळ कारभारामुळे भुसावळ शहर आणि परिसरातील आणि सातत्याने त्रस्त आहेत. अशातच मे हिटचा तडाकामुळे सुद्धा नागरिक त्र स्त आहेत. भुसावळ शहरातील प्रभाग 22 मधील कस्तुरी नगरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने विजेचा अतिउच्च दाब निर्माण झाल्यामुळे घरातील वीज उपकरणे अचानक बंद पडत आहे. तसेच एलईडी बल्ब वगैरे फुटत आहेत. हाय व्होल्टेजमुळे या प्रभागातील नगरातील नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत रात्री दिवसा सुद्धा हाय व्होल्टेज मुळे नागरिकांना एवढ्या उकाड्यांमध्ये घरात राहणे ही अति त्रासदायक झालेल आहे . हाय व्होल्टेज च्या मुळे नागरिकांचे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळण्याची , निकामी होण्याची भीती निर्माण झालेली आहे. याबाबत महाराष्ट्राचे विद्युत वितरण कंपनीकडे सदर नगरातील रहिवाशांनी तक्रार केली मात्र त्या तक्रारीची पोच पावती सुद्धा तक्रारदारांना देण्यास संबंधित विद्युत वितरण कंपनीच्या ऑफिस मधील कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली व आम्ही पोचपावती देत नसतो असे सांगून तिथून तक्रारदारांना तेथून निघून जाण्यास सांगितले. तक्रार केल्यानंतर देखील अद्याप पावतो देखील कस्तुरी नगरातील विजेच्या अतिउच्च दाबाचा समस्या जैसे थे आहे. त्यामुळे सदर प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी त्वरित याबाबत संबंधित कार्यकारी अभियंता यांना जाब विचारला. त्यांनी ही समस्या त्वरित सोडविण्याच आश्वासन दिल, मात्र तरी देखील ती समस्या सुटलेली नसल्याने. शेवटी जावळे यांनी थेट याबाबत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल न घेतल्यास याविरुद्ध आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते जावळे यांनी एका प्रसिद्ध पत्रकांद्वारे कळविलेआहे.



