भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे राम नवमीनिमित्त रामजन्माेत्सव साेहळा अतिशय उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला यानिमित्त सदाबहारदार भक्तीगीते सादर केल्याने भाविक मंत्रमुग्ध झाले हाेते.
दरम्यान १७ रोजी प्रारंभी श्रींचे स्नान अभिषेक पूजा सकाळी .५:३०. ते ७:३० यावेळेत झाल्यानंतर दुपारी १२ वाजता तसेच राम जन्माेत्सवानिमित्त सुंदर पाळणा म्हटला गेला. यावेळी राम जन्मला सखी, गा बाळांनो श्री रामायण, सेतू बांधा रे, दशरथा घे हे पायसदान, कानडा राजा पंढरीचा, अबीर गुलाल उधळीत रंग, रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा, आदी भक्तीगीते गायक किरण सोहळे व वरूण नेवे यांनी सुमधुर स्वरात सादर केली. त्यांना साथसंगत तबलावादक उमेश सूर्यवंशी हार्माेनियम सुयाेग गुरव यांनी केली. गण गण गणात बोते तसेच श्री रामाचा जय जय कार करीत असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.




