भुसावळला लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

,भुसावळ –भुसावळ विधानसभा मतदार संघाकरीता मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी यांच्या कडून सोमवार रोजी इव्हीएम ऑपेरेशन प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक चूक होऊ नये अथवा सर्व कर्मचारी प्रशिक्षित असावेत याकरिता दि.१५/०४/२०२४
रोजी प्रांत कार्यालय भुसावळ येथे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी मतदान कसे करावे याचे मॉकड्रिल करून घेण्याचे नियोजन जितेंद्र पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले.
वेगवेगळया सत्रात सदर प्रशिक्षण पार पडले. आजच्या प्रशिक्षणात एकूण२८३ कर्मचाऱ्यांपैकी २५५ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले तसेच तहसिलदार निता लबडे व अंगद असटकर यांनी सर्वाच्या शंकाचे निरसन केले. विशेष प्रविण्यासह प्रशिक्षणार्थीना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.