भुसावळात उद्या उबाठा गट शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा ;

भुसावळ   - येथे शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा संपर्क नेते संजय सावंत संपर्क नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत  जळगाव जिल्हा शिवसैनिकांचा भव्य निर्धार  मेळाव्याचे आयोजन  मंगळवार
 दिनांक १६/४/२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता  चितोडे मंगल कार्यालय ,जळगाव रोड भुसावळ आयोजित करण्यात आला आहे. 


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून
संजय सावंत , संपर्क नेते- जळगाव जिल्हा)
दिपक सिंग राजपूत जिल्हा प्रमुख शिवसेना
विष्णू भंगाळे, ( जळगाव जिल्हा प्रमुख)
गजानन मालपुरे जिल्हा संघटक शिवसेना
दिलीप भोळे माजी आमदार शिवसेना , जगदीश कापडे माजी जिल्हा प्रमुख शिवसेना हे मान्यवर नेते मार्गदर्शन करतील.
तरी भुसावळ शहर व तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी,युवा सेना,महिला आघाडी, व सर्व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन भुसावळ शिवसेना शहर व तालुका उबाठा गटाचे आयोजकांनी केले आहे . .