जळगाव :
अल्पवयीन तेरा वर्षीय मुलीस राहत्या घरातून फूस लावून कुणीतरी इसमाने पळवून नेले. शनिवार, 13 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पिंप्राळा शिवारात ही घटना घडली.

अल्पवयीन मुलीचा कुटुंबियांनी शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.


