लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता PRO, FPO यांचे मॅाकड्रील आणि चाचणी प्रशिक्षण संपन्न :


१२-भुसावळ विधानसभा मतदार संघाकरीता मतदान केंद्रावर नियुक्त PRO (मतदान केंद्राध्यक्ष) तसेच FPO (प्रथम मतदान अधिकारी) यांच्या कडून दि.12/04/2024 रोजी प्रांत कार्यालय भुसावळ येथे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी मतदान कसे करावे याचे मॉकड्रिल प्रात्यक्षिक मास्टर ट्रेनर यांनी दिले. त्या करीता वेगवेगळया सत्रात 15 टेबलची व्यवस्था करण्यात आली होती एका टेबलला प्रशिक्षणार्थीची व्यवस्था केली होती. केंद्राचा नियु्क्त अधिकारी व कर्मचारी यांच्या कडुन लेखी स्वरूपात प्रश्न सोडवुन घेतले नंतर त्यांना मार्क दिले जातील ज्यांना 70 पेक्षा कमी मार्क पडतिल त्यांना पुन्हा लेखी चाचणी दयावी लागेल असे जितेंद्र पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले तसेच तहसिलदार निता लबडे यांनी संगणक संकेतांक क्युआर कोड वरील ऑनलाईन प्रश्न कसे सोडवावे यांचे विषयी माहिती दिली वअंगद असटकर यांनी सर्वाना मार्गदर्शन केले.
अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी रावेर लोकसभा मतदार संघ अंकुश पिनाटे यांनी प्रशिक्षण ठिकाणी पाहणी केली. तसेच उर्वरीत कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण दि. 15/04/2024 सोमवार रोजी ठेवण्यात आले आहे.