रेल्वे संबळपूर ते पुणे उन्हाळी विशेष गाड्या



प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन रेल्वे द्वारा संबळपूर ते पुणे दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
संबळपूर ते पुणे उन्हाळी विशेष रेल्वे सेवा
08327 साप्ताहिक विशेष गाडी प्रत्येक रविवारी दिनांक १४.०४.२०२४ ते ३०.०६.२०२४ पर्यंत संबळपूर येथून २२.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल. (१२ फेरी)
08328 साप्ताहिक विशेष गाडी प्रत्येक मंगळवारी दिनांक १६.०४.२०२४ ते ०२.०७.२०२४ पर्यंत पुणे येथून ०९.१५ वाजता सुटेल आणि संबळपूर येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. (१२ फेरी)
थांबे -: बारगढ रोड, बालनगीर, टिटलागढ, कांताबाजी, खारियार रोड, महासुमुंड, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगांव, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइन या स्थानकांवर थांबेल.
संरचना: 1 वातानुकूलित -2 टियर 4 वातानुकूलित -3 टियर, 09 शयनयान श्रेणी, 06 द्वितीय श्रेणी , 2 लगेज कम गार्ड ब्रेक वैन
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.