रावेर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशातील बर्हाणपूर येथे सीमा बैठक झाली. यावेळी आगामी निवडणुका निष्पक्ष व शांततेत पार पडण्यासाठी महाराष्ट्र व बर्हाणपूर सीमा तपासणी नाक्यांवर वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्यासह आदर्श आचारसंहितेचे पालन करून परस्पर समन्वय निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अवैध शस्त्रे, दारू, रोख रकमेची वाहतूक होणार नाही यासाठी तपासणी नाक्यांवर काटेकोरपणे तपासणी होईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर बुधवारी बर्हाणपूर जिल्हाधिकारी कार्यालयात सीमा बैठक झाली. जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निर्भय वातावरणात शांततेत पार पाडणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. रावेर लोकसभेसाठी 13 मे रोजी मतदान होणार असल्याने जळगाव-बर्हाणपूरच्या सीमेवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करावा, आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोर पालन तसेच परस्पर समन्वयाने कारवाई केली जाईल, असा निर्धार यावेळी करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी भव्या मित्तल यांनी जिल्ह्यातील मागील निवडणुकीच्या काळात केलेले काम व अनुभव कथन केले. निवडणुकीशी संबंधित विविध मुद्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. परस्पर समन्वय निर्माण करून अवैध शस्त्रे, दारू, रोख रक्कम यासह सीमावर्ती चौक्यांवर काटेकोर देखरेख, तपासणी आणि कारवाई केली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीला जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, बर्हाणपूर जिल्हाधिकारी भव्या मित्तल, बर्हाणपूर पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार, जिल्हा पंचायत सीईओ सृष्टी देशमुख, जळगाव जि.प.चे मुख्याधिकारी अंकित, फैजपूर उपविभागीय अधिकारी देवयानी यादव, उपविभागीय महसूल अधिकारी डॉ.सीमा, बर्हाणपूरच्या पल्लवी पुराणिक उपस्थित होत्या.



