महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला :

मुंबई : महाविकास आघाडीतील जागा वाटपांचा तिढा अखेर सुटला आहे. मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटपाची अधिकृत माहिती देण्यात आली. ठाकरे गट 21 तर काँग्रेस पक्ष 17 व शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 10 लोकसभा मतदार संघात लढणार आहे. सांगली लोकसभा मतदार संघातील वाद आता मिटला असून या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अ‍ॅड.रोहिणी खडसे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई

शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जागा लढणार
बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवेसना पक्ष 21 जागा लढणार
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य