भुसावळ – इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ या सामाजिक संस्थेने विविध क्षेत्रात विविध स्तरावर अलौकिक प्रकल्प पार पाडले असून क्लबच्या कार्याची पावती म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं ट्रेझरर म्हणून येथील डॉ रश्मी राजीव शर्मा याची निवड झाली या निवडी मुळे भुसावळच्या नावलौकिकात भर पडली असून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा इनरवील क्लब च्या डॉ रश्मी शर्मा यांनी खोवला आहे यामुळे भुसावळ शहराच्या प्रत्येक नागरिकाला ही बाब अभिमानास्पद आहे. डॉ रश्मी शर्मा यांच्या नावाने भुसावळ शहराचं नाव संपूर्ण जगात जाणार याचा सार्थ अभिमान प्रत्येक सदस्य सखीला तर आहेच व सर्व भुसावळवासीयांना सुद्धा आहे.

यानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ च्या वतीने डॉक्टर रश्मी शर्मा यांचा यथोचित सत्कार सोहळा पार पडला. क्लबच्या अध्यक्षा अलका भटकर तथा प्रतिष्ठा महिला मंडळ च्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्या हस्ते डॉक्टर रश्मी शर्मा यांना गौरवण्यात आले. जागतिक स्तरावर इनरव्हील क्लब आज त्यांचं शताब्दी वर्ष साजरा करत आहे या शंभर वर्षाच्या कारकीर्दीत या सामाजिक संस्थेने विविध क्षेत्रात विविध स्तरावर अलौकिक प्रकल्प पार पाडलेले आहेत. भुसावळ शहरातील या इनरविल क्लबला जवळपास 47 वर्ष पूर्ण होत आहे या क्लबचं पास्ट प्रेसिडेंट पासून तर डिस्ट्रिक्ट चेअरमन तथा राष्ट्रीय स्तरावरील विविध पद डॉ शर्मा भूषवलेली आहेत आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची निवड झाली. सदर कार्यक्रम प्रसंगी भुसावळ इनरवील क्लब अध्यक्षा अलका भटकर तथा रजनी सावकारे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांच्याविषयी विस्तृत माहिती सांगितली. तर क्लबच्य सर्व सदस्यांनी डॉ रश्मी शर्मा यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून सत्कार केला .
डॉक्टर रश्मी शर्मा यांनी आजपावेतो
क्लब सचिव दोन वेळा 1997-98 आणि 2003-04 अध्यक्ष 1999-2000 परिषद सचिव 1996-97 जिल्हा अध्यक्ष 2009-10 राष्ट्रीय सचिव 2010-11 राष्ट्रीय अध्यक्ष 2014-15 जिल्हा संविधान अध्यक्ष 2016-17 ते 2018-19 राष्ट्रीय संविधान अध्यक्ष 2019-20 ते 2021-22 विविध राष्ट्रीय आणि पश्चिम विभागीय कार्यक्रमांचे संयोजक आदी पदे भूषवलेली आहे
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमल सचदेव ,मनिषा तायडे, रुचिका शर्मा, प्राची राणे, नुतन फालक, डॉ संगिता चांडक,
राजश्री कात्यायनी ,वंदिता पारे, कामिनी तिवारी, आशा पाटील, वैशाली भगत ,सविता शुक्ला, किरण शुक्ला ,मनिषा काबरा, वंदना चांडक ,प्रणोती फालक स्वाती देव, आदींनी परिश्रम घेतले .



