अनाम पीस एंबेसडर आयकॉनिक अवॉर्ड राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. प्रदीप साखरे सन्मानित : भुसावळ तालुका शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघातर्फे डॉ. साखरे यांचा सत्कार

भुसावळ:- भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथील क्रीडा शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रदिप साखरे यांना नुकताच त्यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच व मलेशिया एक्यूप्रेशर आणि न्यूट्रिशन अकॅडमी यांच्यावतीने पुणे येथे अनाम पीस एंबेसडर आयकॉनिक अवॉर्ड ह्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . तसेच भुसावळ येथील शिवजयंती उत्सव समिती ने शिवजयंतीच्या दिवशी शिवभूषण पुरस्कार २०२४ देऊन गौरवण्यात आले. त्या बद्दल भुसावळ तालुका शिक्षण विभागाच्या वतीने त्यांचा श्रीफळ, पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी भुसावळ तालुका शिक्षण विभागाचे किशोर वायकोळे, (गटशिक्षणाधिकारी) डी. बी. धाडी.व तुषार प्रधान (शिक्षण विस्तार अधिकारी) अजित तडवी (शालेय पोषण आहार) सचिन पाटील संजय गायकवाड, देवानंद वाघदरे ,नावेद खाटीक, जितेंद्र पवार, गोकुळ सपकाळे, रमेश दागोडे, सदानंद तायडे, विजय देवरे, बी आर. सी. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी योगेश पाटील उपप्राचार्य नाहाटा कॉलेज भुसावळ आदी उपस्थित होते. तसेच भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने डी एल हिंदी हायस्कूल येथे झालेल्या मुख्याध्यापकांच्या सभेमध्ये मुख्याध्यापक महासंघाचे राज्य अध्यक्ष जे.के. अण्णा पाटील. तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जीपी सपकाळे उपाध्यक्ष मनोज माहेश्वरी यांच्या हस्ते सर्व मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला . सर्वांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.