बल्लारशाह ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एकेरी उद्घाटन विशेष ट्रेन चालवणार

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे बल्लारशाह ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष शुल्क आकारून एकेरी उद्घाटन विशेष ट्रेन चालवणार आहे.
01002 एकमार्गी उद्घाटन विशेष बल्लारशाह येथून दि. १६/३/२०२४ (शनिवार) रोजी सकाळी ८.३० वाजता सुटेल आणि दि. १७/३/२०२४ (रविवार) रोजी ६.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: चंद्रपूर, भांदक, वणी, पिंपळखुटी, आदिलाबाद, किनवट, बोधाडी बुजुर्ग, सहस्रकुंड, हिमायत नगर, भोकर, मुदखेड, हुजूर साहिब नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगांव, अंकई, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर.

संरचना: १३ डब्बे – एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित , एक तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ८ सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण: विशेष शुल्कासह 01002 एकेरी विशेष गाड्यांचे बुकिंग आधीच सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू आहे. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून
करण्यात आले आहे.