भुसावळ : भुसावळ तालुक्यातील चोरवड गावाजवळील हॉटेल मातोश्रीसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने कुर्हे गावातील 34 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार, 14 मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजता घडला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन श्रीराम सपकाळे (34, रा.कुर्हा, ता.भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे.
भुसावळ तालुक्यातील कुर्हा येथे सचिन सपकाळे हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. गुरुवार. 14 मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजता सचिन सपकाळे हा चोरवड गावाजवळील हॉटेल मातोश्री जवळून पायी जात असताना अज्ञात वाहनाने सचिनला जोरदार धडक दिली. या धडकेत सचिनचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनावरील चालक वाहन घेवून पसार झाला. याप्रकरणी महेंद्र शिवदास सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुरूवारी अज्ञात वाहनावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहे.



