पारोळा तालुक्यात बालिकेवर अत्याचार : नराधमास अटक :


पारोळा-
पारोळा तालुक्यातील एका गावात शेतात नऊ वर्षाच्या चिमुकलवर तोंड दाबुन अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील एका गावात एका नऊ वर्षाच्या बालिकेवर नर्सरी च्या शेडमध्ये दुपारी एक ते दीड च्या दरम्यान पिडीत मुलगी व तिचा भाऊ हे शेतात काम करीत असताना संशयीत आरोपी हिरालाल अमरसिंग बारेला यांने पिडित मुलीच्या भावाला लिंबू घेण्यासाठी पाठविले व नंतर मुलगी एकटी असल्याचे पाहून त्याचे तोंड दाबून अत्याचार केला झाला प्रकार पिडीतेने आपल्या आईला सांगितले पिडीतेच्या आई लागलीच पारोळा पोलीस स्टेशन गाठले व आरोपी हिरालाल अमरसिंग बारेला रा,शेनपाणी ता चोपडा याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली
पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे.
हा सर्व प्रकार रविवार १० मार्च रोजी एक ते दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडला
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहे.