वरणगावला कृतीम पाणी टंचाई , पंधरा दिवसांनी होत आहे , पुरवठा भाजपाचे जिल्हाधीकाऱ्यांना साकडे :

वरणगाव शहराला मागील पंधरा दिवसापुर्वी तपत कठोरा येथील जॅकवेल पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणी पुरवठ्या परिणाम झाल्याने नागरिकाना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती मात्र जिल्हाधीकारी यांच्या आदेशानुसार हतनूर जलशयातुन अर्वतन सोडण्यात आले होते तरीही नागरिकाना अजूनती पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने भाजपाच्या पदाधीकाऱ्यानी जिल्हाधीकरी भेट घेत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची गळ घातली आहे

शहराल नियमीत पाणी पुरवठा तपत कठोरा जॅकवेल मधुन केला जातो मात्र मागील पंधरा दिवसा पुर्वी नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊन नागरिकाना पाण्यासाठी भटकंती करावी लागली होती त्यावेळा मा जिल्हाधीकारी यांनी
तातडीने हतनुर धरण प्रशासनाला नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हतनुर जलशयातून राखीव आर्वतन सोडण्या बाबतचे आदेश दिले होते पाण्याचे आर्वतन सोडून जॅकवेल परिसरात पुरेशा पाणी साठी उपलब्ध असून सुद्धा अवेळी पाणी पुरवठा शहरात होत असल्याने नागरिकात तिव्र संताप व्यक्त केला जात असल्याने नियमीत पाणी पुरवठा होण्यासाठी भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी यांची भेट घेत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन देऊन साकडे घालण्यात आले
या वेळी निवेदन देताना सुनिल काळे , शे अखलाक शे युसुफ डॉ प्रविण चांदणे , शे जावेद शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते