भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान – सन्मानाने महिला भारावल्या ;

भुसावळ : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिवसानिमित्त रविवार, 10 रोजी ‘नारी तू नारायणी: सन्मान स्वित्वाचा’ या कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . . रविवारी दुपारी 3.30 वाजता संतोषी माता हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे , उद्योगपती मनोज बियाणी , सोनू मांडे , नगरसेवक किरण कोलते , रेलसिटीचे अध्यक्ष मनोज सोनार , सचिन नवगाळे , सौ संगीता बियाणी , सौ रश्मी शर्मा यांचेसह मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलणाने करण्यात आले . यावेळी प्रतिष्ठा संस्थेच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी प्रास्ताविक सादर केले . प्रारंभी अनुष्का आंबेकर हिने मधुर आवाजात स्वागत गीत सादर केले . तदनंतर महादेव गृपने बहारदार नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळवली .तर सक्षम नारी संस्थने नैराश्याकडे वळू नका , जे निराश आहे त्याना मानसिक आधार द्या समजून घ्या ,कोणत्याही अंधश्रद्धेला वा भोंदू बाबाना बळी पडू नका मानसोपचार तज्ञाचा सल्ला घ्या व आत्महत्या टाळा टोकाची भूमिका घेऊ नका असा सल्ला नाटीका सादर करून दिला . तर प्रतिष्ठा महिला संस्थेच्या पदाधिकाती व कलाकारांनी नारी तु नारायणी यावर अतिशय बहारदार नाटिका सादर केली महिला ही स्वतः श्रेष्ठ आहे जो देतो तो घेत नाही, तिच्या पासून सृष्टी तयार होते अनेक नाते तयार होतात टी शक्ती आहे .महिलांनी खचून न जाता सक्षमपणे कर्तव्य व जबाबदारी सांभाळा नारी सृजन आहे असा संदेश देत संवेदनशील नाटिका सादर केली .यावेळी महिलांनी विविध विषयांवर नाटिका, नृत्य आदी कलागुण सादर केले . शहरातील विविध महिला संस्थाचे अध्यक्ष व सचिव यासह कर्तृत्ववान महिलांचा शाल प्रमाणपत्र , स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला, तसेच समाजाचा चौथा खांब म्हणून समजले जाणारे पत्रकार बांधवांचा विशेष सन्मान केला जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मात करून जिभेने चित्र काढणारी व संगीत कलेची आवड जपणारी विकलांग चित्रकार राशी प्रवीण पाटील हिचा विशेष सत्कार करण्यात आला यासह अँथेलिट – ममता जांगिड , शैक्षणिक क्षेत्रात संगीता बियाणी ,
क्रृषी क्षेत्र -संगिता पाटिल , डॉ रेखा पाटील अध्यात्म माध्यमातुन व्यक्तिमत्त्व विकासा साठी कार्यरत व
डॉ .नीलिमा नेहते महिलांना व्यायाम आणि आरोग्य बाबत कार्य तसेच भारत विकास परिषद च्या माध्यमातुन सामाजिक कार्य , नुपूर संस्थेच्या भरत नाट्य व कथ्थक नृत्य विशारद चारुलता भालेराव , नुपूर भालेराव , धनश्री जोशी , उद्योजिका सौ सुनीता जोशी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय बहारदार व सुमधुर स्वरात राजश्री देशमुख यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वरूण इंगळे, अनिता आंबेकर, सोनल महाजन,मनीषा काकडे, वैशाली सैत्वाल,जयश्री चौधरी,वैशाली भगत,पल्लवी वारके,रंजना परदेशी,वर्षा लोखंडे यांनी परिश्रम घेतले….