पंतप्रधानांच्या हस्ते उद्या 85 हजार कोटीच्या विविध प्रकल्पांचे होणार लोकार्पण : महाराष्ट्रात 506 प्रकल्प तर भुसावळ विभागात 32 प्रकल्पांचे होणार उद्घाटन : मनमाड-जळगाव तिसरी लाईनचे काम प्रगती पथावर – डीआरएम इति पांडे :

भुसावळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 12.03.2024 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित समारंभांमध्ये एकूण 85 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करून लोकार्पण करतील आणि 10 वंदे भारत गाडयांना हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागाच्या प्रबंधक श्रीमती इति पांडे यांनी आज सोमवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली .
यावेळी डीआरएम यांनी सांवितले की , ८५ हजार कोटी
रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करून लोकार्पण कार्यामध्ये महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या हस्ते एकूण 506 प्रकल्पांचे उद्घाटन राष्ट्राला समर्पित केले जाईल. यापैकी 32 प्रकल्प भुसावळ विभागांतर्गत येतात ज्यात 25 एक स्टेशन-एक उत्पाद स्टॉल, दोन माल गोदामे, बडनेरा वॅगन दुरुस्ती कार्यशाळा, मनमाड-जळगाव तिसरी लाईन, एक जन औषधी केंद्र आणि दोन रेल्वे कोच रेस्टॉरंटचा समावेश आहे.
भुसावळ विभागात हा कार्यक्रम नासिक, मनमाड़ ,धुळे ,जलगांव, शेगाव, अकोला, बडनेरा, बुरहानपुर आणि खंडवा येथे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले . तसेच
विभागातील प्रकल्पांची थोडक्यात माहिती दिली याअंतर्गत
वन स्टेशन वन प्रॉडक्ट (OSOP) ; “विश्वकर्मा” योजना :
स्थानिक “विश्वकर्मा” म्हणजेच कुंभार, सुतार, शिल्पकार, मोची, शिंपी, विणकर, लोहार आणि स्थानिक कारागीर यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन स्थानिक कार्यक्रमाला प्रोत्साहन देईल जेणेकरून त्यांना व्यापकपणे पोहोचण्यास मदत होईल.
हे स्थानिक आणि पारंपारिक उत्पादनांना एक्सपोजर, विक्री आणि उच्च दृश्यमानता प्रदान करेल. यामुळे देशाच्या पारंपारिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल.
रेल्वे स्थानकावर औषधी केंद्र सुरू करण्यात येत असून
सर्वांसाठी दर्जेदार औषधे आणि उपभोग्य वस्तू रेल्वे स्थानकांवर नाममात्र दरात उपलब्ध करून देणे हा भारत सरकारच्या ध्येयाचा एक भाग आहे रेल्वे स्थानकांच्या आसपासच्या लोकांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण करण्यात मदत होईल.
वॅगन दुरुस्ती कार्यशाळा, बडनेरा
बडनेरा वॅगन दुरुस्ती कार्यशाळा मध्य रेल्वेच्या भुसावळ आणि नागपूर या दोन प्रमुखविभागांच्या माल डेपोंना सेवा देईल ज्यामुळे वॅगनची उपलब्धता वाढेल. तसेच 1100 व्यक्तींना प्रत्यक्ष रोजगार आणि 5000 हून अधिक व्यक्तींना विविध आऊटसोर्स उपक्रमांद्वारे अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल.
रेल कोच रेस्टॉरंट (RCR)
रेल कोच रेस्टॉरंट (RCR) हा एक अनोखा उपक्रम आहे ज्यामध्ये रेल्वे कोचचे जेवणाच्या सुविधेसाठी रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या आस्थापनांनी ग्राहकांना आरामदायी आणि संस्मरणीय जेवणाचे वातावरण उपलब्ध करून देताना आरामदायी आसनव्यवस्था आणि थीमॅटिक सजावटीसह रेल्वे प्रवासाचे जुने आकर्षण कायम ठेवले आहे. भुसावळ विभागात ही सुविधा अमरावती, अकोला, शेगाव आणि नाशिकरोड स्थानकांवर उपलब्ध आहे.
मनमाड-जळगाव तिसरी लाईनचा मोठा प्रकल्प
मनमाड-जळगाव तिसरी लाईन प्रकल्प हा रेल्वेच्या पायाभूत सुविधांमधील एक मोठा टप्पा आहे.
या महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाची एकूण लांबी 160 किमी असून एकूण 75% काम पूर्ण झाले आहे.
प्रकल्पाची एकूण किंमत ₹ 1035.16 कोटी आहे.याच्या पूर्ततेमुळे व्यस्त मुंबई-भुसावळ मार्गावरील गर्दी कमी होईल आणि गाड्यांची गतिशीलता सुधारेल.
खंडवा – सनवाद मेमू (विशेष ट्रेन)
प्रवाशांच्या सोयीसाठी खंडवा-सनावद दरम्यान नवीन मेमू ट्रेन सुरू करण्यात येत आहे.
ही गाड़ी आठवड्यातून पाच दिवस (बुधवार आणि गुरुवार वगळता) धावेल . ही ट्रेन 08 डब्यांच्या संरचनेत धावणार असल्याचे डीआरएम यांनी सांगितले . यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते .