भुसावळातील झेडआरटीआयच्या प्राचार्यासह लिपिकाची कोठडीत रवानगी –

भुसावळ : भुसावळातील रेल्वेच्या झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये भाडे तत्वावरील गाडीच्या लॉकबुकवर स्वाक्षरी करण्यासाठी 9 हजारांची लाच झेताना झेडआरटीआयच्या प्राचार्यासह लिपिकाला पुण्यातील सीबीआय पथकाने अटक केली होती. संशयितांची सीबीआय कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दोन्ही संशयीतांची भुसावळ येथील दुय्यम करागृहात दोन्ही जणांची रवानगी करण्यात आली.
भुसावळ येथील रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडआरटीआय) भाडेतत्त्वावरील वाहनाच्या लॉगबुकवर जुन्या तारखेत स्वाक्षरी करण्यासाठी 9 हजारांची लाच स्वीकारताना प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरेशचंद्र जैन, कार्यालय अधीक्षक (निविदा) योगेश देशमुख यांना सीबीआय पथकाने बुधवार, 6 मार्च रोजी अटक केली. या दोन्ही संशयितांना गुरुवार, 14 मार्च रोजी न्यायालयाने दोन दिवस सीबीआय कोठडीत सुनावली. दोन दिवस पूर्ण झाल्यावर शनिवारी दोन्ही संशयीतांना न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे जैन व देशमुख यांची रवानगी भुसावळ येथील दुय्यम कारागृहात करण्यात आली. याबाबत सीबीआय अधिकार्‍यांनी याबात काहीही माहिती देण्यास नकार दिला.