भुसावळ – भुसावळ तालुका तलाठी संघाची निवड करण्यात आली यावेळी भुसावळ तालुका अध्यक्षपदी पवन नवगाळे यांची बिनविरोध निवड झाली असून उपाध्यक्षपदी सुनिता वाघमारे व सचिव मिलिंद तायडे यांची निवड करण्यात आली . भुसावळ तालुका तलाठी संघ नूतन कार्यकारिणीत सह सचिव निता जयले, कोष्याद्यक्ष विशाखा मून, खजिनदार नितीन केले, एस.एम.कुंभार. सदस्य माधुरी सोनवणे, एस.एल वळवी, जिल्हा महिला सदस्य मोनिका बडगूजर, कायदेशीर सल्लागार पी.एल.पाटील, तर विभागीय अध्यक्ष एफ.एस.खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.नवनिर्वाचित कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे .



