भुसावळ – महाराष्ट्र पुणे येथील यशदा या शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत, भुसावळ येथील आरती चौधरी (समुपदेशीका) यांची मार्गदर्शक म्हणून निवड होऊन दि. 22 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंत ग्रामविकास विभागातर्फे महाराष्ट्रातील ग्रामपंचायती व स्थानिक संस्था, यांना बालस्नेही व महिला स्नेही ग्रामपंचायत या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या या निवडी बद्दल मित्र परिवारासह सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



