मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित नंदाताई निकम यांचा शिवसेनेत प्रवेश: महिला संघटनांनी केला सत्कार :

भुसावळ :- येथील माजी नगरसेविका नंदाताई निकम यांचा नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून बाळासाहेब यांच्या शिंदे गटात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा अध्यक्ष समाधान महाजन, अल्पसंख्यांक चे जिल्हा अध्यक्ष हमीद सर, यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी ला मोठा हादरा बसला आहे. त्यांचे सामाजिक व महिला बचत गटाचे काम बघता त्यांच्या सोबत भुसावळ शहरातील मोठया प्रमाणात महिलांचे संघटन सोबत आहे. त्यांचा वांजोळा रोड नवीन हुडको कॉलनीच्या महिलां संघटनानी स्वागत केले. त्यावेळी वैशाली विसपुते, वर्षा आऊजा,शितल विसपुते,सुरेखा ठाकूर,यांच्या सह परिसरातील महिला बचत गट, महिला मंडळ इत्यादीनी त्यांचे स्वागत केले याप्रसंगी सो नंदाताई निकम यांनी महिला साठी असलेल्या शासनच्या विविध योजनांची माहिती दिली या योजनेचा सर्व स्तरातील महिलांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले. कार्यक्रम चे सूत्रसंचालन वैशाली विसपुते यांनी केले.