भुसावळ- शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी हे आज जिल्हा दौर्यावर असून यावल येथे जातांना त्यांनी भुसावळला धावती भेट दिली यावेळी ढोल-ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करून गुरुजींचे जोरदार स्वागत करण्यात आले . दरम्यान डीवायएसपी कृष्णांत पिंगळे व पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनी चोख बंदोबस्त ठेवला स्वागत झाल्यावर त्यांनी धारकरी आणि नागरिकांशी सुद्धा संवाद साधला.

यावेळी रितेश जैन , रोहित महाले , यांचेसह धारकरी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .



