नाहाटा महाविद्यालयात उद्योजकता या विषयावर व्याख्यान :


भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात “इन्क्युबेशन, इनोव्हेशन, इंट्रेपनरशिप आणि लिंकेज” या समिती अंतर्गत उद्योजकता या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य बी. एच. बऱ्हाटे, प्रमुख वक्ते म्हणून सी.ए. धरम किशोर सांखला,समितीप्रमुख प्रा.डॉ. उमेश फेगडे, विज्ञान समन्वयक प्रा. हर्षल पाटील, कला समन्वयक प्रा.डॉ. किरण वारके, वाणिज्य समन्वयक प्रा.डॉ. रश्मी शर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख वक्ते सी.ए. धरम किशोर सांखला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इन्क्युबेशन सेंटरची संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगितली आणि एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी एक नवीन कल्पना मांडून तिचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा हे पीपीटी प्रेझेंटेशनच्या सहाय्याने स्पष्ट केले. तसेच उत्पादनासाठी लागणारे भूमी श्रम भांडवल हे घटक आपणास भारत सरकार कोणत्या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देते त्यासाठी आपणास कोणती कागदपत्रे लागतील व ती कुठे कशी तयार करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा.डॉ. एस व्ही पाटील यांनी असे सांगितले की, विद्यार्थ्यांनी नोकरी च्या शोधात न फिरता नवीन स्टार्टअप अंतर्गत व्यवसायाकडे वळावे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपला व आपल्या देशाच्या विकासात हातभार लावावा. नोकरी मागण्यापेक्षा इतरांना नोकरी कशी देता येईल याचा विचार करून उद्योग व्यवसायाकडे वळावे. या व्याख्यान कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध शाखांचे 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. चंद्रकांत सरोदे, प्रास्ताविक, प्रा.डॉ. रश्मी शर्मा तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. किरण वारके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. एन. एस. पाटील, प्रा.डॉ. आर एस नाडेकर, प्रा.डॉ. पी. एच इंगोले प्रा.डॉ. एम. जे. जाधव, प्रा.डॉ. सचिन एस. कोलते, प्रा. दिगंबर महाजन, प्रा. सपना जंगले, प्रा. जयश्री चौधरी आदींनी परिश्रम घेतले.