भुसावळ - येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक, प्रमुख वक्ते म्हणून भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ दयाघन एस राणे आणि सायन्स असोसिएशन चे चेअरमन प्रा डॉ जी पी वाघुळदे सर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना प्रॅक्टीकल्स वर भर दिला म्हणजे त्यांच्या वैज्ञानिक जाणीवा प्रगल्भ होऊन त्यांच्या विज्ञानाच्या संकल्पना सुस्पष्ट होऊन ते संशोधनाच्या मार्गावर अग्रेसर होऊ शकतील. आणि देशाची वाटचाल महसत्तेकडे होऊ शकेल.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना प्रा डॉ दयाघन एस राणे यांनी डॉ चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या नोबल पारितोषिक प्राप्त संशोधना बद्दल अत्यंत सोप्या भाषेत माहिती देवून ध्वनी लहरींची निर्मिती आणि त्याचे मानवी जीवनावर कसे परिणाम होतात हे प्रात्यक्षिक डेमोंस्ट्रेशन च्या माध्यमातून प्रभावीपणे स्पष्ट केले. त्यांनी या प्रसंगी रामन परिणाम हा विविध शास्त्रांच्या संशोधनात कसा उपयुक्त ठरला हे सांगून देशाची या वर्षाची संकल्पना ” विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान” बद्दल माहिती दिली. देशाची अंतराळ संशोधनातील माहिती सोबतच देतानाच आपल्याजवळ उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करून साध्या साध्या गोष्टींचा वापर करून प्रयोग करीत आपल्याला आपले जीवन सुसह्य येईल आणि देश ही संशोधनात अग्रेसर होऊन महासत्तेकडे वाटचाल करेल असे ही स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा डॉ जी पी वाघुळदे यांनी विज्ञान दिवसाचे औचित्य स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रा डॉ माधुरी पाटील यांनी केले
कार्यक्रम प्रसंगी प्रा डॉ अंजली पाटील, प्रा डॉ जयश्री सरोदे, प्रा श्रेया चौधरी, प्रा संगीता धर्माधिकारी, प्रा आर डी भोळे, प्रा डॉ अनिल सावळे, प्रा प्रा. धनश्री नेहेते, प्रा गायत्री नेमाडे आणि इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते




