भुसावळ – आनंद शब्द.. नावातच खुप काही… वाटणारे अन् घेणारे दोन्ही प्रफुल्लित… असाच काहीसा अनुभव… लायनेस क्लब भुसावळ आयोजित रंग भरण स्पर्धेत आला ..ही स्पर्धा जि.प.प्राथमिक शाळा बोरावल बुद्रुक ता.यावल येथे घेण्यात आली. प्रसंगी प्रथमः माता सरस्वती पूजन करण्यात आले.आलेल्या स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती योगिता बोंडे यांनी लायनेस क्लब च्या अध्यक्षा श्रीमती प्रिंयका चौधरी व सेक्रेटरी सौ.रेखा धुपे यांचे पुष्पगुच्छ देऊन केले.शाळेचे नवनिर्वाचित लाडके मुख्याध्यापक उद्धव चंद्रभान कोळी याने गोड व्यक्तीमत्व लाभलेल्या शिरीष सोहळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले..स्वागतानंतर, मोबाईल चे दुष्परिणाम या विषयावर विद्यार्थ्यांनी नाटिका सादरीकरण केले… हास्य, वैचारिक मंथन करणारी ,गहन ..विषयावरील नाटिका उपस्थित सर्वांना खुपचं आवडली.स्पर्धेसाठी रंग खडू व रंग भरण करण्यासाठी आणलेले साहित्य वाटप विद्यार्थ्यांना क्लब च्या सर्व सदस्यांनी केले.सुचनेचे अचूक पालन करुन अचूक परीक्षणानुसार प्रथम खुशी सोनवणे, प्रथम पारितोषिक चैताली कोळी, द्वितीय पारितोषिक गौरव कोळी, तृतीय.पारितोषिक
यांना बक्षिस वितरण करण्यात आले.तसेच सर्वच सुंदर होते…पण स्पर्धा ती स्पर्धा… विद्यार्थ्यांना चॉकलेट देवून कार्यक्रमाची गोड सांगता झाली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व नियोजन शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती कविता मोहन महाले यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती प्रिंयका चौधरी , श्रीमती रेखा धुपे ,
श्रीमती शिरीष सोहळे , श्रीमती कविता महाले , श्रीमती पल्लवी जाधव ,श्रीमती रीना गायकवाड श्रीमती अनिता इंगळे , श्रीमती जयाताई इंगळे, श्रीमती अश्विनी पाटील यांचेसह सर्व लायनेस क्लब च्या सदस्या यांनी परिश्रम घेतले . तर बोरवल स्कुलच्या कविता महाले यांनी मनोगत व्यक्त केले .



