विज्ञान दिनानिमित्त नाहाटा महाविद्यालयात “शाश्वत विकास” या विषयावर व्याख्यान


भुसावळ:- भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात, विज्ञान मंडळ या समितीमार्फत शाश्वत विकास या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, प्रमुख वक्ते प्रा.डॉ. मनोज जाधव, समिती प्रमुख प्रा.डॉ. जी. आर. वाणी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. मनोज जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाश्वत विकासाचा इतिहास, उद्दिष्टे व पुनर्रचना याविषयी सखोल मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन 2024 ची थीम “विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान” याची सखोल माहिती दिली. या व्याख्यान कार्यक्रमास महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास ताप्ती एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती प्रमुख प्रा. डॉ. जी. आर. वाणी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रा. डॉ. चंद्रकांत सरोदे यांनी मांडले. तंत्रज्ञ म्हणून प्रा. हर्षल पाटील, श्री. किशोर नारखेडे व श्री. विनय चौधरी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. गौरी एम. पाटील, प्रा. डॉ. सचिन येवले, प्रा. डॉ. विलास महिरे प्रा.डाॅ. सचिन कोलते आणि महाविद्यालयातील सर्व विज्ञान शाखेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.