दुचाकी चोरटयास दुचाकीसह एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद –


जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी एरंडोल तालुक्यातील दुचाकी चोरट्याला जेरबंद केले असून त्याचे जवळून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे .
फिर्यादी रवि वासुदेव कुकरेजा वय-40, रा.सिधी कॉलनी जळगाव यांची दिनांक 3 ते दिनांक 5 फेब्रुवारी दरम्यान मोटरसायकल चोरी झाली होती . याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्हांत पोलीस निरीक्षक श्री बबन मारुती आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त
बातमीवरुन दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता संशयीत आरोपी सुभाष ममराज राठोड वय-40, रा. खेळगाव
तांडा ता.एरंडोल जि.जळगाव-यास ताब्यात घेण्यता आले त्याच्या ताब्यातून सिंधी कॉलनी परीसरातून चोरी झालेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.. सदर संशयीत आरोपीस गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कडून चोरीस गेलेली मोटासायकल जप्त केली आली आहे
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी, , अपर पोलीस अधिक्षक अशोक
नखाते व उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप गावित, तसेच पोलीस निरीक्षक बबन
मारुती आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक दिपक जगदाडे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश
शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोना विकास सातदिवे, पोना किशोर पाटील, पोना योगेश बारी, पोना सचिन पाटील, पोकॉ छगन तायडे
अशांनी केली असुन गुन्हाचा पुढील पोना विकास सातदिवे करीत आहे.