जळगाव – जळगाव जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीस एमआयडीसी पोलीसांनी अटक केली . आज रोजी न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपणीय माहीती मिळाली की, जळगाव जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेला आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे रा रामेश्वर कॉलनी जळगाव हा रामेश्वर कॉलनी परीसरात आलेला असून बाबतची माहीती मिळाल्यावरुन सांयकाळी 6 वाजता त्यास सप्तश्रृंगी मंदीराजवळ रामेश्वर कॉलनी परीसरातुन अटक करण्यात आली.
ही कारवाई सफौ अतुल वंजारी, पोहेका. गणेश शिरसाळे, पोना योगेश बारी, सुधीर सावळे, विकास सातदिवे पोका. नितीन ठाकुर, मुकेश पाटील, नाना तायडे, किरण पाटील यांनी त्याला ताब्यात घेतले . त्यावेळी त्याचेकडुन एक लोखंडी तलवार मिळुन आल्याने सदर तलवार ही जप्त करण्यात आली आहे. हद्दपार आरोपीवर एमआयडीसी पोलीस स्टेशन ला चोरीचे एकुण पाच गुन्हे असुन रामानंद नगर पोलीस स्टेशनला दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यास आज रोजी न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी केली आहे.


