चाळीसगाव येथील गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक यांचा उपचार दरम्यान मृत्यु –


चाळीसगाव –
गोळीबार प्रकरणातील गंभीर जखमी झालेले चाळीसगाव भाजपाचे माजी नगरसेवक महिंद्र मोरे यांचा आज दि.१० रोजी पहाटे ३:३० वाजता नाशिक येथे मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांव येथे भाजपचे एका माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर दि.७ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गोळीबार झाला होता, सुमारे पाच ईसम गोळीबार करण्यासाठी चारचाकी वाहनातून आले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाले होते, सदर ईसम सिल्वर कलरच्या कारमधून उतरून हनुमान वाडीतील कार्यालयात घुसून गोळीबार करतात अन पुन्हा आपल्या त्याच वाहनात बसून पसार देखील होतात, यात बाळू मोरे यांना गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते, त्यांच्यावर चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने तेथून त्यांना नासिक येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा दि.१० रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास यांची प्राणज्योत मालवली त्यांचे पार्थिव आज १० रोजी चाळीसगावात दाखल होणार आहे, या घटनेने चाळीसगाव तालुक्यात शोककळा पसरली असून. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात सात संशयित आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे, गुन्ह्यातील कार देखील ताब्यात मिळाली आहे, तर मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे,