भुसावळ प्रतिनिधी –

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या हेतुने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विदयार्थी यांच्यासाठी जळगाव जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धेचे २५ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेचे ७वे वर्ष आहे.
वकृत्व स्पर्धा ५ गटात होणार असुन प्रत्येक गटातील ३ विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येइल. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देउन प्रोत्साहन दिले जाणार आहे.
पहिला गट इयत्ता १ली व २री, २ मिनिट, विषय: छत्रपती शिवाजी महाराज तर, दुसरा गट इयत्ता ३री व ४थी, ३ मिनिट, विषय : शिवरायांचे बालपण, माता जिजाऊ आणि बाल शिवाजी, महाराजांच्या शौर्याचे प्रतीक-प्रतापगड, तिसरा गट इयत्ता ५वी ते ७वी, ४ मिनिट, विषय: शिवरायांचे शूरवीर मावळे, शिवरायांची गुणग्राहकता, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, चवथा गट, इयत्ता ८वी ते १०वी, ५ मिनिट, विषय : राज्याभिषेक शिवछत्रपतींचा, आज शिवराय असते तर, शिवरायांची युद्धनीती, पाचवा गट, खुलागट ७ मिनिट, विषय : छत्रपती शिवाजी महाराज – द मॅनेजमेंट गुरु, शिवशाही ते लोकशाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, शिवकालीन किल्ल्यांचे भू- सामारिक महत्त्व असे असतील.
स्पर्धा रविवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजता भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कुल, नहाटा कॉलेज शेजारी, जामनेर रोड येथे होणार आहे.स्पर्धकांनी अधिक माहिती साठी प्रकल्प प्रमुख देव सरकटे- ८९८३६१०९१७, प्रकल्प समन्वयक समाधान जाधव ९०२२४६४९८१, सह समन्वयक अमित विजय चौधरी ९४२१७४१८२४, सह समन्वयक सचिन पाटील ७३०४०१७२१७ यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेमध्ये नावनोंदणीची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. स्पर्धेच्या दोन फेऱ्या असतील. प्रथम फेरी झाल्यानंतर त्यातून प्रत्येक गटातून १० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यानंतर दुसरी फेरी ही भुसावळ शहरात घेतली जाईल. यावेळी निवड झालेल्या स्पर्धकाला पुन्हा तोच विषय सादर करावा लागेल. त्यातून अंतिम निकाल जाहीर केला जाईल आणि त्याच ठिकाणी त्याच दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला जाईल.
उपक्रम समिती मध्ये ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, डॉ.संजू भटकर, जीवन महाजन, प्रसन्ना बोरोले, प्रदीप सोनवणे, विक्रांत चौधरी, अमितकुमार पाटील, शैलेंद्र महाजन, प्रा.डॉ.शामकुमार दुसाने, भूषण झोपे, हितेंद्र नेमाडे, राजेंद्र जावळे, राजू वारके, कुंदन वायकोळे, तेजेंद्र महाजन, राहुल भारंबे, ललित महाजन, निवृत्ती पाटील, जीवन सपकाळे, हरीश भट, संदीप रायभोळे, प्रमोद पाटील, मंगेश भावे, उमेश फिरके, केतन महाजन, चंद्रकांत सूर्यवंशी, गणेश जावळे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांचा समावेश आहे.


