महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे फोटो काढल्याच्या संशयातून रीक्षा चालकाला मारहाण –

जळगाव : महाविद्यालयीन विद्यर्थिंनींचे फोटो काढत असल्याच्या संशयावरुन रीक्षा चालकाला तरुणांनी झोडपले. त्यानंतर तरुणांनी संशयित तरुणाच्या रीक्षाी तोडफोड करीत तिला पटली केली. शुक्रवार, 9 रोजी शिरसोली रोडवर एका इन्स्टिट्यूट कॉलेजजवळ ही घटना घडली.

फोटो काढल्याच्या संशयातून मारहाण
शिरसोली रोडवर अनेक महाविद्यालयात आहेत. महाविद्यालयात जाण्यासाठी अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी रीक्षा तसेच बसने प्रवास करतात. शहरातील एका रीक्षा चालकाने या तरुणींचे फोटो मोबाईलमध्ये काढले. ही माहिती तरुणींना मिळाली. हा प्रकार काही तरुणांना कळाला. या तरुणांनी तत्काळ रीक्षा चालकाचा मोबाईल चेक केला असता त्यात तरुणींचे फोटो आढळून आले. हा प्रकार पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणांनी चालकाला बदडले. त्यानंतर त्याच्या रीक्षाची तोडफोड करत ती रस्त्यावर उलटी करण्यात आली. ही घटना कळताच पोलिसांनी धाव घेतली. काही काळपर्यत येथे गर्दी झाली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.