भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वराडसीम या दत्तक गावात विशेष हिवाळी शिबिर दिनांक 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024 या दरम्यान सक्षम युवा समर्थ भारत या संकल्पनेवर आधारित यशस्वीरित्या संपन्न झाले.
विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक हे उपस्थित होते. त्यांच्यासमवेत ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक शिबिराच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटक शहीद सैनिक कुटुंब सदस्य सौ. ममता पाटील ह्या उपस्थित होत्या. तसेच पंडित नेहरू विद्यालयाचे अध्यक्ष अशोक किसन पाटील व चेअरमन अरुण एकनाथ वाणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही. पाटील उपस्थित होते.
या शिबिरा दरम्यान विविध श्रमसंस्कार, अध्यात्मिक संस्कार, बौद्धिक संस्कार, नीतीमूल्य, राजकीय संस्कार व मानवतावादी संस्कारांची पेरणी करण्यात आली. विविध बौद्धिक सत्रांचे आयोजन करण्यात आले.
दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा ग्रामीण रुग्णालय यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. तसेच दुपारनंतर पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ रासेयो विभागीय समन्वयक डॉ. अनिल बारी उपस्थित होते.
दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. बी.एच.बऱ्हाटे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक श्री.एस. एस.खेडकर, प्रा.डॉ.जी.आर.वाणी, प्रा.हर्षल पाटील, श्री.विनय चौधरी, श्री.नारखेडे उपस्थित होते.तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.आर.एस.नाडेकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.व्ही.एन.महिरे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.ममताबेन पाटील उपस्थिती होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या सल्लागार समितीचे सदस्य .उमेश पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमात राष्ट्रिय सेवा योजनेचे स्वयंसेवक कॅम्प सिनियर प्रफुल्ल वाघमारे, अश्विनी झोपे, गोविंदा बावस्कर, गौरी ढाके हे उपस्थित होते तसेच वैभव पाटील, जगदीश पाटील, प्रवीण पाटील,आकाश बावस्कर, सागर पाटील व इतर स्वयंसेवक उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, चेअरमन . महेश फालक, सेक्रेटरी श्री.विष्णूभाऊ चौधरी, कोषाध्यक्ष .संजयकुमार सुशीलकुमार नाहाटा व संचालक मंडळ यांची प्रेरणा व शुभेच्छा लाभली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डि.गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पंडित नेहरू विद्यालय व ग्रामपंचायत वराडसिम यांचे अनमोल सहकार्य लाभले.




