कर्करोगदिना निम्मित भुसावळ पालिकेतर्फे उद्या मोफत रोग निदान शिबीराचे आयोजन :


भुसावळ – भुसावळ नगरपालिके तर्फे नसरवानजी फाईल राजीव गांधी वाचनालय मुनव्वर खान यांच्या घरा जवळ सोमवार दीनांक 5/2/2024 रोजी दुपारी 2 वाजे पासुन मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .
या रोग निदान शिबीरामध्ये ऊच्चरक्तदाब, मधुमेह,लहान मुलांचे आजार ,स्तन व गर्भाशय संबंधित आजाराची तपासणी करण्यात येणार असून बालरोग तज्ञ , स्त्री रोग तज्ञ , फिजिशियन यांचे कडून मोफत तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच मोफत (मेडिसिन )औषधे दिले जाणार आहे .
या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ तौसीफ खान पठान यांनी केले असल्याची माहिती राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालय चे अध्यक्ष मो मुनव्वर खान यानी दिली आहे .