वृंदावन महिला बचत गटातर्फे हळदी कुंकू संपन्न : महिलांनी लुटले भेट वस्तूंचे वाण :

जळगाव – वृंदावन महिला बचत गटातर्फे मकर संक्रांती निमित्त शनिवार रोजी हळदी कुंकवाचा कार्यक्रम महानगरपालिकेचे कर्मचारी सौ. गायत्री पाटील व कृष्ण सखीच्या अध्यक्ष सौ रूपाली राजू बाविस्कर यांचे उपस्थितीत हळदी घेण्यात आला.

समता नगर साईबाबा मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात बचत गटातील महिलांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजना विषयी माहिती देण्यात आलीU.तसेच 100 महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी बचत गटातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. रूपाली राजू बाविस्कर यांनी मानले .