रावेर लोकसभा मतदारसंघ हे कॉग्रेंस पक्ष ताकदीने लढवनार..रावेर लोकसभेची जागा राष्ट्रीय काँग्रेसला मिळावी..!



चोपडा :– रावेर लोकसभा हा मतदासंघ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे या मतदार संघात मागचे एक दोन अपवाद वगळता हा मतदार संघ कॉग्रेंस पार्टी चा गढ राहीला आहे.यामुळे
रावेर लोकसभा मतदारसंघ हे कॉग्रेंस पक्ष ताकदीने लढवनार आहे.रावेर लोकसभेची जागा ही काँग्रेसला मिळावी अशी आग्रही मागणी पदाधिकारी यांनी केली असल्याची माहिती अल्पसंख्यक विभाग प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान यांनी दिली .
हा मतदारसंघ काँग्रेस प्रणित विचारांचा मतदासंघ आहे.या मतदार संघात पक्षाची ताकत इतर पक्षांपेक्षा जास्त आहे.या मतदार संघातील रावेर विधानसभा व मलकापुर विधानसभेवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे.काँग्रेसचे आमदार त्या ठिकाणी आहे,रावेर मलकापूर या ठिकाणी नगराध्यक्ष काँग्रेसचे आहेत. या मतदार संघात मराठा,मुस्लिम ,लेवा समाजा चे मतदान जास्तीचे आहे.
2019 मध्ये काँग्रेस पक्षा कडून लोकसभेची ऊमेदवारी माजी खासदार डॉ ऊल्हास पाटील ऐन वेळी फार्म भरण्याचे दोन दीवस अगोदर घोषीत झाली होती.सदर उमेदवाराने पुर्ण ताकदीने निवडणूक लढविली नसतांना मतदारांनी भरभरून मतदान रुपी आशीर्वाद दिले यावेळी 3 लाख 19 हजार मत हे पक्षाच्या जोरावर मिळाले होती. बाकी मतदान प्रक्रिया ई वी ऐम व्दारा जिंकले होते ते वेगळे…
यावेळी आमचा कडे लोकसभे साठी सक्षम ऊमेदवार आहे. जर पक्षाने समाज निहाय मतदारांचा विचार करुन ऊमेदवारी दिली तर मराठा समाजाचे जळगांव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील,जर लेवा समाज चा विचार केला
आमदार शिरीष चौधरी, भुसावळचे माजी आमदार निळकंठ फालक, मलकापुर चे डॉ अरविंद कोलते , प्रतीभाताई शिंदे, व मुस्लिम समाज ला महाराष्ट्रारात एक जागा देता आली तर या मतदार संघ मध्ये 3 लाख 75000 मुस्लिम मत आहे या साठी तीस वर्षा पासुन कांग्रेस चे ऐक निष्ठ कार्यकर्ते प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यक विभाग मो.मुनव्वर खान,ॲड. सलीम पटेल माजी प्रदेश सचिव जळगांव
याना ऊमेदवारी द्यावी अशी मागणी मतदासंघांतून जोर धरत आहे.
इंडिया आघाडी मुळे सेना,कॉग्रेंस, राष्ट्रवादी कांग्रेस व ईतर पक्ष मिळून या निवडणुका आरामात जिंकु शकतो.या सर्व बाबीचा विचार करुन ही जागा कॉग्रेस लाच द्यावी असी आमची मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिका अर्जुन खरगे,एआयसिसी चे महासचीव खासदार मुकुल वासनिक,महाराष्ट्र चे प्रभारी चैन्नी तलाजी व प्रांत अध्यक्ष नाना पटोले यांचेकडे करण्यात येत आहे.