भुसावळ – “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा “या उपक्रमांतर्गत न .पा .शाळा क्रमांक 35 येथील विद्यार्थ्यांना “आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास “या उपक्रमासाठी डिजिटल व्यवहार कसे होतात हे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी शहरातील “कुकरेजा सुपरमार्ट “येथे नेण्यात आले . सदर उपक्रमासाठी व्यवस्थापन समिती, पालक वर्ग आणि दुकानाचे व्यवस्थापक व्यवस्थापक .संजय कुकरेजा यांनी परवानगी दिलेली होती .दुकानातील कर्मचारी कुमारी भावना चौधरी यांनी मुलांना बिलिंग करणे ,QR कोड स्कॅन करणे, बिलाची रक्कम स्कॅन करणे इत्यादी विषयी माहिती दिली .विद्यार्थ्यांना डेमो दाखवला. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले .एक प्रॉडक्ट घेऊन मोबाईल वरील पेटीएम चा वापर करून बिल कसे भरावे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले .डिजिटल व्यवहार करताना कोणती सावधानता बघायला हवी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .डिजिटल व्यवहारांसाठी कोणती साधने वापरले जातात याविषयी माहिती दिली .शाळेच्या इनचार्ज मुख्याध्यापिका यांनी दुकान व्यवस्थापनाचे आभार मानले.





