भुसावळ – कुऱ्हा पानाचे येथे २६ जानेवारी २०२४ नमो चषक चे आयोजन केले होते, नमो चषक चे उदघाटन प्रमोद सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले होते ,

आमदार संजय सावकारे यांच्या नैतृत्वात कुऱ्हा पानाचे येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती यांनी आयोजन केले होते,
सदर खुल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे सामने गेल्या ४ दिवसपासून चालू होते तसेच २९ जानेवारी रोजी आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते
फायनल विजेत्या आणि उपविजेत्या टीम ला बक्षीस आणि ट्रॉफी देऊन क्रिकेट स्पर्धेची सांगता करण्यात आली..!!
सुटी मध्ये असलेल्या क्रिकेट सामन्याचा क्रिकेट प्रेमींनी यांचा आनंद घेतला..
सदर क्रिकेट स्पर्धा सुरळीत पार करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या युवकांचे आमदार संजय जी सावकारे यांनी कौतुक केले…



