भुसावळ –
भुसावळ शहरातील श्री रामचंद्र जी महाराज संस्थान ट्रस्ट , राम मंदिर वार्डातील लक्ष्मी चौकात स्थित असलेलं दीडशे वर्ष ब्रिटिश कालीनपूर्व सार्वजनिक प्राचीन श्रीराम मंदिराच्या घुमट निर्मिती आणि कलश स्थापनेचा कार्यक्रम ट्रस्ट आणि हिंदू जागरण मंच भुसावळ यांचे संयुक्त विद्यमाने 22जानेवारी2024 या अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीराम माझ्या प्राणप्रतिष्ठेच्या दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 8 सेकंद या वैश्विक मुहूर्तावर भुसावळ शहरात सुद्धा१५०वर्षानंतर हा कलश स्थापना, अभिषेक होम हवन 18 जोडप्यांच्या शुभ हस्ते करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला .
या संपूर्ण कार्यक्रमाचे पौरोहित्य श्रीराम मंदिराचे पुजारी अतुल देशपांडे, श्री जितेंद्र आठवले, श्री संजय जी बोचरे गुरुजी, श्री श्रीकांत घिररणीकर यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.
या मंदिराच्या घुमट निर्मितीसाठी आणि कलश स्थापना ही लोक सहभागातून करण्यात आलेली आहे. सदर मंदिराचा कलश रोहन आस्था सुंदर कांड परिवाराचे मुख्य गायक सुनील लाहोटी, स्वामी नारायण मंदिर भुसावळ यांचे संत, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भुसावळ चे आमदार संजय सावकारे , हिन्दु जागरण मंच चें जिल्हा संयोजक ऍड.योगेश बाविस्कर, तालुका संयोजक मुन्ना ठाकूर, डॉ.सूर्यभान पाटिल,उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या संचालिका डॉ.केतकी पाटील डॉ. वैभव पाटील, समाजसेवक निर्मल कोठारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संचालक डॉ वीरेंद्र झांबरे ,नमा शर्मा, विनोद शर्मा, मनोज बियाणी, निळकंठ भारंबे,किरण महाजन ,बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शहर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक ., बब्बल सेठ ठे टी, इंजिनियर प्रमोद सिंह साहेब,शहरातील विविध क्षेत्रातील समाजसेवक, राजकिय पदाधिकारी,विविध सांप्रदायाचे संत , विविध समाजांचे समाज बांधव, आदींसह हजारो रामभक्तांनी दिवसभरात श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. याप्रसंगी रेल्वेच्या बँड पथकाकडून श्रीराम मंदिराच्या कलश रोहन सोहळ्याला वंदना करण्यात आली. श्रीराम मंदिर परिसरात मंगल वाद्यांची सुद्धा आयोजन करण्यात आले होते. श्रीकृष्ण मंदिर इस्कॉन भुसावळ यांच्या पथकाने श्रीराम मंदिरात सुंदर राम भजन कीर्तन सोहळा साजरा केला, त्रिपदी परिवार भुसावळच्या सर्व महिला मंडळांनी सुद्धा भजन सोहळा या ठिकाणी पार पाडला, बालकलाकार नुपूर भालेराव येणे प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये कथक नृत्यद्वारे श्रीरामांना वंदना सादर केली.
श्रीराम मंदिर परिसरामध्ये गुरुद्वारा सभा भुसावळ यांचेकडून लंगर प्रसाद व्यवस्था करण्यात आली होती, हा सोहळा उत्साहात संपन्न पार पडला.

कलश रोहन घुमट संकल्पना हिंदू जागरण मंच यांच्या सहकार्याने संपन्न झाला .यशस्वीतेसाठी श्रीरामचंद्रजी संस्थान च्या अध्यक्षा श्रीमती सरिता चौक संचालक राधेश्याम लाहोटी हिंदु जागरण मंच जिल्हा संयोजक ऍड. योगेश बाविस्कर , मंचचे हिम्मत ठाकूर शिशिर जावळे, महेश भालेराव, हरी अग्रवाल, कैलास सिंग चव्हाण, प्रशांत जाधव,रितेश जैन, चंद्रशेखर पाटील,रितेश जैन जितेंद्रजी चिप्पड, आर एस एस चे पंकज चौक,प्रदीप पाटील हरी भाऊ अग्रवाल यांचे सह सर्व समाज मंडळ लक्ष्मी चौक परिसरातील सर्व नागरिक रामभक्तांनी
आदींनी परिश्रम घेतले


