लेखक – प्र .ह.दलाल

श्रीरामाच्या अंगी सर्व सद्गुण एकवटलेले दिसून येतात,म्हणजेच सर्व सद्गुणांची परिसीमा झालेली आहे म्हणूनच रामाला मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात.श्रीराम भारतीयांच्या मनामनात विराजमान आहेतच,तथापि भारताबाहेरही श्रीराम अनेक देशात वंदनीय आहेत.त्याचा हा संक्षिप्त आढावा…. पूर्वीचा ब्रह्मदेश म्हणजे आजचा म्यानमार या देशात रामावती नावाचे शहर हजारो वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आले आहे अमरपुर नावाच्या गावात एक विहार असून त्यात श्रीरामाची सुंदर चित्रे रेखांकित केलेली आजही दिसून येतात मेघात शहरातील नाथलिंग नावाच्या मंदिरात धनुर्झारी रामाची सुंदर मूर्ती आहे त्या देशात अनेक ठिकाणी झालेल्या उत्खननात शेकडो रामाच्या मुर्त्या सापडल्या आहेत त्या देशातील प्रसिद्ध काव्य ग्रंथात राम या गण या ग्रंथाला सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले आहे राम या गन म्हणजे ज्यात रामाचे चरित्र वर्णिलेले आहे असे रामायण . सयाम मध्ये प्रत्येक राजा आपल्या नावापुढे रामाधिपती ही पदवी लावतो सयांमधील लोक आपल्या नावापुढे अजूनही राम हा शब्द जोडतात उदाहरणार्थ महावराजबुद्धरा म, सुखदेव राम सयाम च्या प्राचीन राजधानीचे नाव आयोध्या होते असे म्हणतात तेथे गल्लोगल्ली रामलीला होते तेथील काठपुतळीच्या खेळात रामलीला असते. सया म मधील रामायनाला ,”राम कियेना” असे म्हणतात. जावा तिल लोक रामाला आपला पूर्वज म्हणतात तेथील मुख्य नदीचे नाव शरयू आहे जागराम हे अत्यंत प्राचीन मंदिर असून त्याच्या भिंतीवर रामलीला अनेक चित्र काढलेली आहे . रामचरित्राचे अनेक झाले तेथे सापडले आहेत आज या देशातील अनेक गावात रामलीला कार्यक्रम संपन्न होत असतो अनेक लोक रामचरित्रावर लिहिलेले ग्रंथ पठण करतात.बोर्निओ मधील लोक श्रीराम कथा आपल्या देशात घडली व आपण श्रीरामाचे वंशज आहोत असे मानतात.दरवर्षी तेथे रामलीला होते.चीन मध्ये अनाम कम जातकम,दशरथ जातकं ज्ञान प्रस्थान इ ग्रंथांमध्ये राम चरित्र वर्णिलेले आहे. याशिवाय श्रीलंका, मलाया,सह काही देशातही रामाचे चरित्र सांगणारे ग्रंथ आहेत स्पॅनिश,इंग्रजी,फ्रेंच,जर्मन,रशियन, इ भाषांत रामायणाची भाषांतरे झाली आहेत. महर्षि वाल्मिकी यांनी रमायानविष यी लिहिले आहे,की, जोपर्यंत या भूतलावर वृक्ष,पर्वत, इ आहेत तोपर्यंत मनुष्य राम. कथे लाही विसरणार नाही .त्यांचे हे उदगार यथार्थ च नाही का? जय श्रीराम !!



