घेतो गरुड भरारी आम्ही आता आकाशी…..
स्पर्धेत बाजी मारतो आम्ही उभ्या जगाशी …..

—कविवर्य प्रतापसिंग बोदडे यांच्या काव्यपक्ती आज सकाळीच ओठांवर आल्यात…त्याच कारण आमची लाडकी कन्या अमृता उर्फ नंदिनी एम. एस.(सिव्हिल) च्या उच्च शिक्षणासाठी आज भल्या पहाटे सहारा विमानतळा वरून लंडनकडे झेपावली……
भुसावळच्या सेंट अलायसेंस मधून शिक्षणाचा सुरु झालेला हा प्रवास पुढे पुणे पर्येंत पोहचला…. पुणे येथील कुस्रो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी येथून डिप्लोमा सिव्हिल तसेच नामांकित झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च या नामांकित कॉलेज मधून बी. इ (सिव्हिल ) चे शिक्षण गोल्डमेडल मिळवून प्रथम श्रेणित लेकीने पूर्ण केले….. आणि आज तिच्या जिद्दीने ज्ञानाच्या आत्मबळावर परदेशात झेप घेतली…..
काळ झपाट्याने बदलत जातो…. स्त्री शिक्षणाचे अधिकार नाकारलेल्या काळ्याकुट्ट इतिहासाला जोती -सावित्रीने मातीत गाडले …आणि आज हजारो चिमण्यांनी आकाशी झेप घेतली…. आमची अमृता (नंदिनी)देखील त्यातलीच एक…..
काल परवा अंगा खांद्यावर खेळणारी…. पुढे अंगणात रमणारी….. लेक इतकी पटकन मोठी झाले कळलेच नाही….!
खरं तर लेकीला घरा पासून विमानतळा पर्येंत पोहचवीणारा प्रवास हा खूपच समिश्र भावनांचा राहिला…. एका डोळ्यात दूर परदेशी पाठवतांना सगळ्याच आई वडिलांना जी काळजी असते ती आमचीही हॊती आणि आहे. पण दुसऱ्या डोळ्यात लेकीच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच दागिना महत्वाचा असल्याने आनंद ही आहे…. याच भावनांच्या कोलाहलात लेकीला परदेशी जातांना शुभेच्छा दिल्यात….. लेकीच्या या शैक्षणिक प्रवासास आमच्या कुटुंबावर जिवापाड प्रेम करणारे आदरणीय लोकनेते नाथाभाऊ व तुम्ही स्नेही मित्रांनी अंतःकरणा पासून शुभेच्छा देऊन आमचे बळ वाढविले…अश्या भावना प्रा.डॉ. सुनील नेवे /सौ. विनिता नेवे यांनी यावेळी व्यक्त केल्या तुमचे हे ऋण आम्ही नक्कीच जीवनभर जपू…. तुम्हा सर्वांना मकरसंक्रातिच्या गोड गोड शुभेच्छादिल्या






