भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय चर्चासत्र ‘इनोवेशन इन बायो जिओ केमिकल सायन्सेस’या विषयावर शुक्रवार, 12 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चा सत्राकरीता वीर नर्मद साउथ गुजरात युनिव्हर्सिटी प्रा.डॉ.नवीन बी.पटेल (सुरत) व युजीसी ह्यूमन रीसोर्स डेव्हलपमेंट सेंटर राणी दुर्गावती यूनिवर्सिटी जबलपूरचे असिस्टंट डायरेक्टर प्रा.डॉ.संजीव कुमार पांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

प्राध्यापकांना जास्तीत-जास्त सहभागाचे आवाहन
चर्चासत्राचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव रसायशास्त्र प्रमुख प्रा.डॉ.दीपक दलाल यांच्याहस्ते होईल. चर्चासत्रासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, कन्व्हेनर प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, कॉर्डिनेटर प्रा.संजय चौधरी, प्रा.आर. डी.भोळे, डॉ.माधुरी पाटील, प्रा.निर्मला वानखेडे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परीश्रम घेत आहेत. या चर्चासत्रासाठी विद्यापीठ परीक्षेत्रातील प्राध्यापकांनी जास्तीत-जास्त लाभ घेऊन उपस्थिती द्यावी, असे आव्हान आयोजकांनी केले आहे.


