भुसावळात जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन : प्रभू श्रीरामचंद्र यांचे बद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपतर्फे निषेध व निदर्शने :

भुसावळ – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान श्रीराम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने आव्हाड यांच्या या वक्तव्यावर भाजपने संताप व्यक्त केला या घटनेचा तीव्र निषेध करीत भुसावळ तालुक्याचे भाजपाचे आमदार संजय सावकारे सह कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या विरोधात निषेध व्यक्त करून व जोरदार निदर्शने करीत आव्हाड यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले . भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरूवारी ४ जानेवारी रोजी आ. आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येवून वक्तव्याचा निषेध करण्यात आला. हे आंदोलन भाजपाचे आमदार संजय सावकारे, शहराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधाज जोरदार निदर्शने करण्यात आले याप्रसंगी पिंटू ठाकूर, प्रमोद सावकारे, विलास सपकाळे, गोपी राजपूत, प्रा.दिनेश राठी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.