भुसावळ – भाजपा ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन रावेर लोकसभेच्या खा. रक्षा खडसे तालुक्याचे आमदार संजय सावकारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडी भुसावळ शहराध्यक्षपदी जितेश प्रकाशलाल माखिजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर तरुण तडफदार कर्तव्यदक्ष कार्यकर्त्याची निवड करण्यात आली या निवडी बाबत। समाजातील सर्व स्तरावर जितेश प्रकाशलाल माखिजा यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. या निवडीच्या वेळी आ. संजय सावकारे ,परिक्षित बऱ्हाटे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक निक्की बत्रा, संदीप सुरवाडे, अजय नागराणी, केशव गेलानी, रिंकू चेलानी आदी उपस्थित होते.



