भुसावळ- आज दिनांक 27 डिसेंबर 2023 बुधवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या शेती व शेतकऱ्यांच्या संदर्भात चालू असलेल्या धोरणां विरुद्ध आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये कांदा निर्यात बंदी केली त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा भाव कवडीमोल स्वरूपात आला म्हणुन अवकाळी पावसामुळे सडलेले कांदे व खराब झालेला कापूस रस्त्यावर टाकून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच कापसाला 7020 चा हमीभाव असताना बाजारात व्यापाऱ्यांद्वारे प्रतिक्विंटल 6 हजार पेक्षा जास्त भाव मिळत नाही याचाही निषेध व्यक्त करण्यात आला व व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आली. यामध्ये विविध मागण्यांचे निवेदन मा. भुसावळ तहसीलदार नीता लबडे यांना देण्यात आलं यात प्रामुख्याने भुसावळ तालुक्याठिकाणी नाफेड केंद्र सुरू करण्यात यावे, कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवावी, कापसाला हमीभाव मिळाला पाहिजे, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे काही ठिकाणचे अजूनही पंचनामे झाले नाहीत ते झाले पाहिजे, पीक विम्याचे लाभ शेतकऱ्यां पर्यंत लवकर पोहोचले पाहिजे अशा विविध मागण्या करण्यात आल्या या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी सरकारचा निषेध व्यक्त करत सरकार ठिकाणावर आहे का? असा जाब विचारला. याप्रसंगी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भुसावळ तालुका अध्यक्ष दीपक मराठे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, जिल्हा प्रवक्ता वाय.आर. पाटील, किसान सेल तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, लीगल सेल प्रमुख गौतम साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागो पाटील, भुसावळ नगरपालिका माजी नगरसेवक उल्हास पगारे विधानसभा क्षेत्र प्रमुख नाना पवार, महेश सोनवणे, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, पप्पू जकातदार, अनिल त्रंबक महाजन, दीपक निळे, इफ्तेखार मिर्झा, तसेच साकरी- वेल्हाळे- जाडगाव- साकेगाव- खडका- कुऱ्हा पानाचे- पिंपळगाव- ओझरखेडा- येथील शेतकरी नारायण पाचपांडे, एकनाथ धांडे, किशोर पाटील, अशोक सरोदे, रितेश सरोदे, रणजीत सिंग पाटील, प्रशांत नारखेडे विशाल बुगले, गणेश बोदडे ललित सरोदे, स्वप्नील नेहते, प्रवीण बावस्कर, गोकुळ पाटील, सुवर्णा इंगळे, बाबुराव बावस्कर, जितेंद्र सरोदे, सुनील इंगळे, तुकाराम बावस्कर, रामसिंग पंचमसिंग पाटील, सौ रेखा जाधव, सौ सारिका पाटील, पियुष कोल्हे, तुषार भारंबे, राजेंद्र पवार, डेबा पाटील, राहुल मावळे, सोपान बेंडाळे, सचिन पाटील, प्रकाश नारखेडे, हेमा पाटील, आकाश कुरकुरे, आयुष पाटील आदी कार्यकर्ते व शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते





