मुक्ताईनगर :- मुक्ताईनगर येथील साहित्यिक तथा कादंबरीकार डॉ.भालेराव यांना मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ दीपनगर यांचा व क्रांतीसुर्य प्रतिष्ठान दीपनगर यांच्या वतीने दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार 2024 जाहीर झाला असून सदरचा पुरस्कार तीन जानेवारी 2024 रोजी मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे .

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दर्जेदार व संस्कार शिक्षण मिळावे विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य रुजावी यासाठी कार्य करणाऱ्या छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या गतिमान आधुनिक भारताचे भक्कम पायाभरणी व्हावी या उदात्त हेतूने सदरचे पुरस्कार दिले जातात.
सदरचा पुरस्कार 3 जानेवारी बुधवार रोजी सकाळी दहा वाजता नवीन क्लब दिपनगर कॉलनी भुसावळ विद्युत केंद्र येथे दिला जाणार आहे. असे मानव सेवा ईश्वर सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन सरदार यांनी कळवले आहे.


