भुसावळ– ललवानी फाउंडेशन तर्फे श्रीमती प.क. कोटचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांचा कनिष्ठ सुपुत्र स्वर्गीय स्वप्निल ललवाणी याचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अचानक दुःखद निधनामुळे ललवाणी परिवार हादरला होता. साहित्य0परंतु स्वर्गीय स्वप्नीलच्या स्म्रुतींना कायम उजाळा देत हा परिवार त्याच्या वाढदिवसानिमित्त व त्याच्या स्मृतीदिनानिमित्त समाजसेवेत कार्यरत असतो. वराडसीम येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा या ठिकाणी सर्व विद्यार्थिनींना वह्या, पेन ,पेन्सिल व शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ व मिठाई देऊन तसेच शाळेला फाईली व खेळण्याचे साहित्य देऊन त्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका पौर्णिमा फेगडे यांनी प्रास्ताविकातून शाळेबद्दलची माहिती दिली व ललवाणी परिवाराच्या योगदानाबद्दल माहिती दिली. तसेच ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील यांनी शैक्षणिक महत्त्व व तसेच शिक्षण हे आपल्या जीवनात बदल घडवून आणण्याचे साधन असून विद्यार्थिनींनी शिक्षण प्रवाहात झोकुन दिले पाहिजे. तसेच वराडसिम सारख्या मुलींच्या शाळेत जरी संख्या कमी असली तरी निसर्गरम्य वातावरणामुळे मुली आनंदाने शिक्षण घेत आहे. तसेच ललवाणी परिवारासारख्यांच्या ऊदात्त हेतुमुळे या गरीब विद्यार्थी ना मदत होते व शिक्षणास हातभार लावला जात असल्याचे नमूद केले. ललवानी फाउंडेशन तर्फे प्रा.डाॅ. डी. एम. ललवानी यांनी स्व.स्वप्नीलच्या जीवनावर प्रकाश टाकून तो शिक्षणात हुशार व तसेच मनमिळावु स्वभावाचा असून उत्तरोत्तर नोकरीच्या माध्यमातून प्रगती करत होता ,तसेच त्याच्या अकाली निधनामुळे जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीच भरून निघणार नाही.असे नमुद करतांना त्यांचा कंठ दाटुन आला होता. स्व. स्वप्नील चे मोठे बंधू सुयश ललवाणी यांनी सुद्धा स्वर्गीय स्वप्निल च्या आठवणी चिरकाल स्म्रुतीत राहाव्या म्हणून “स्व. स्वप्निल स्म्रुती गोकुलग्राम व अनुसंधान केंद्र” ची निर्मिती करीत आहे . या द्वारे गोशाळा स्थापन करून गोसेवा केली जाणार आहे . या शाळेचे शिक्षक राजेंद्र सुरवाडे सर यांनी विद्यार्थिनींना अमोल मार्गदर्शन करून ललवाणी परिवाराशी असलेल्या ऋण संबंधाचे विवेचन करून हा परिवार कायम समाजसेवा करीत असल्याचे आवर्जून नमूद केले. याप्रसंगी स्व.स्वप्निलच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून साहित्य वाटण्यात आले. विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर खुशीचे व समाधानाचे भाव पाहून उपस्थित गदगद झाले. याप्रसंगी ललवाणी परिवाराचे अर्ध्वयु मदनलाल ललवाणी, सौ. शोभा ललवाणी, ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील ,शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, उपसरपंच विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य धीरज पाटील ,समाजसेवक दीपक झारखंडे, पालक बाळू सपकाळे, पत्रकार बापू सोनवणे, भरत कोळी मुख्याध्यापिका पौर्णिमा फेगडे, शिक्षक राजेंद्र सुरवाडे,सौ.कविता भोळे,सौ.गोकुर्णाबाई मेढे व विशेष म्हणजे सर्व विद्यार्थिनी उपस्थित होते.




