संतापजनक : नात्याला काळिमा : कर्णबधिर अल्पवयीन मुलीवर भावासह मित्रांकडून बलात्कार –

नात्याला काळिमा फासणारी एक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. यात अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर तिच्याच लहान भावासह अन्य दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

धक्कादायक म्हणजे 2018 ते 2023 पर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता. काही दिवसांपूर्वी एका 30 वर्षीय तरुणाने ती घरात एकटी असताना जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो वारंवार तिच्यावर अत्याचार करत असे. आणि कुणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी त्यानं दिली होती. दरम्यान, पीडित मुलगी 17 वर्षीय असून, कर्णबधिर आहे. त्या 30 वर्षीय तरुणाने तिच्या घरी येऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता ही घटना काही दिवस दडून राहिली. तसेच, त्याने मारहाण करून कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्या पीडितेला दिली होती.

यांनातर हा सगळा प्रकार लहान भावाला माहीत झाला आणि त्यानेही नात्याला काळिमा फसणारं अतिशय घृणास्पद कृत्य केलं. पीडित मुलगी घरी एकटी असताना त्या लहान भावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा सगळा प्रकार पीडिता कुणाला सांगूही शकत नव्हती.

यानंतर काही दिवसांनी पीडिता आणि तिच्या भावाचा मित्र यांच्यात ओळख निर्माण झाली. ते दोघे एकमेकांचे मित्र होते. मात्र त्यानेही तिच्यासोबत अत्याचार केला. पीडितेच्या ओळखीच्या त्या 23 वर्षीय तरुणाने पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तो तरुण तिच्या भावाच्या सांगण्यावरूनच हे सगळं करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात संतापजनक म्हणजे तब्बल 4 ते 5 वर्ष हे सगळं असच सुरू होतं.

पीडिता एका कर्णबधिर शाळेत शिक्षण घेते. तिथे असलेल्या शिक्षिकेला तिने घडलेला हा सगळा प्रकार सांगितला त्यानंतर या सगळ्याला वाचा फुटली आहे. याबाबत कर्णबधिर शाळेतील शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता करण्यात येते आहे. दरम्यान, याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) गुन्हा दाखल केला आहे. तसंच यासंदर्भातील अधिक तपास आता मुंढवा पोलीस करत आहे.